मुंबई : तारखेनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरुन शिवरायांना अभिवादन केलं आहे.

मोदींप्रमाणेच बिग बींनीही मराठी भाषेत छत्रपती शिवरायांविषयी काव्य पोस्ट केलं आहे.

*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
आई जिजाऊ पोटी!
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
रायगडावर तुम्ही ऊभारली
*... शिवराष्ट्राची गुढी!*
राजे तुम्ही नसता तर
*सडली असती हिँदुची मढी!*
तुम्हा मुळे तर आम्ही
*पाहतो देवळाचे कळस,*
तुम्ही नसता तर नसती
*दिसली अंगनात तुळस!*

||जय भवानी जय शिवराय ||
⛳⛳ शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा ⛳⛳

https://twitter.com/SrBachchan/status/833200873706835968

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्त्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे.' अशा ट्वीटसह मोदींनी शिवाजी महाराजांना नमन करतानाचा फोटो पोस्ट केला होता. पंतप्रधानांनी मराठी भाषेत शिवरायांना नमन करणारे चार ट्वीट्स केले आहेत.

संबंधित बातम्या :


मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिवरायांना नमन


राज्यासह देश-विदेशात शिवजयंतीचा उत्साह


बीडमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांच्या पुतळ्याची आकर्षक सजावट


सातासमुद्रापार शिवरायांचा जयघोष, न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी


शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा!