नवी दिल्ली : कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला अभिनेता आमीर खान उपस्थित राहणार आहे. 20 नोव्हेंबरला गीताचा विवाह कुस्तीपटू पवन कुमार याच्याशी होणार आहे.


आमीरने 'दंगल' सिनेमात महावीर फोगट म्हणजेच गीताच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. कदाचित त्यामुळेच ऑन स्क्रीन मुलीच्या लग्नाला वडिलांचीही उपस्थिती असणार आहे.

महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींनी आमीरला लग्नासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे 'दंगल' सिनेमाचा अभिनेता आमीर आणि दिग्दर्शक नितेश तिवारी हे दोघेही उपस्थित राहणार आहेत.

'दंगल' सिनेमात चाहत्यांना गीता आणि बहिण बबिता कुमारी यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. आमीरने सिनेमात गीता आणि बबिताचे वडिल महावीर यांची भूमिका साकारली आहे.