मुंबई : सुनिल शेट्टीची मुलगी अथियाने 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असतानाच आता त्याचा मुलगाही बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याच्या तयारीत आहे. सुनिल अण्णाचा 21 वर्षीय मुलगा आहन पुढच्या वर्षी सिनेमात झळकणार असल्याची माहिती आहे.
2017 च्या मध्यावर एका अॅक्शन-रोमँटिक चित्रपटात आहन दिसण्याची शक्यता आहे. आहनने मात्र 'अजून मी लहान आहे' असं म्हणत या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
साजिद नादियाडवालांची निर्मिती असलेल्या एका भव्य चित्रपटातून आहन शेट्टी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचे संकेत आहेत. स्क्रिप्टवर काम पूर्ण झालं असून दिग्दर्शक आणि आहनच्या अपोझिट हिरोईनची निवड बाकी आहे. नादियाडवालांच्या 'हिरोपंती'तून टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅननच्या करिअरला उभारी मिळाली.
आहनने अॅक्टिंग आणि फिल्ममेकिंगचा कोर्स अमेरिकेतून पूर्ण केला आहे. सलमान खानची आहनशी असलेली जवळीक पाहून सल्लूच त्याला ब्रेक देण्याची चिन्हं होती. अर्थात नादियाडवालासुद्दा सलमानच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत.
आहन अभिनय, नृत्य आणि दिग्दर्शन या तिन्ही गोष्टींचे धडे गिरवत आहे. जिमिंग करुन त्याने पिळदार शरीर कमवलं आहे. त्याशिवाय वडिलांसारखी दाढी वाढवून नुकतंच त्याने फोटोशूटही केलं आहे.