Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागील वर्ष अमिषासाठी खूपच चांगले गेले.'गदर 2' या चित्रपटाने अमिषाची कारकीर्द पुन्हा एकदा रुळावर आली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. 'गदर'मधील सनी देओल आणि अमिषाची जोडी पुन्हा एकदा गदर-2 च्या निमित्ताने पडद्यावर झळकली. आता, अमिषा पटेलने केलेल्या एका दाव्याने चर्चांना उधाण आले आहे.
48 वर्षीय अमिषाच्या एका मुलाखतीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या मुलाखतीत अमिषाने आपण विवाहित असल्याचा दावा केला आहे. विवाहित असल्याच्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अमिषाने कधी आणि कोणासोबत लग्नगाठ बांधली याची चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहे अमिषाचा नवरा?
अमिषा पटेलने नुकतंच 'फिल्मीज्ञान'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने केलेल्या दाव्याने चर्चांना उधाण आले. या मुलाखतीत अमिषाने आपण विवाहित असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष जीवनात भले मी विवाहबद्ध झाले नाही. पण, एका व्यक्तीवर मी प्रचंड प्रेम करते. या व्यक्तीलाच मी मनात वर योजला असल्याचे तिने म्हटले.
अमिषाच्या मनात कोण?
याच मुलाखतीत अमिषा पटेल पुढे म्हणाली की, 'मला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ खूप आवडतो. मी त्याच्यासाठी जीव देण्यासही तयार आहे. मी माझ्या मनाने आणि मनाने टॉमला माझा नवरा म्हणून स्वीकारले असल्याचे तिने म्हटले. आता तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. अमिषाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूजर्सला चांगलाच धक्का बसला आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.