HanuMan OTT Release Date Announced : बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर तेजा सज्जा (Teja Sajja) याचा 'हनुमान' चित्रपट ओटीटीवर जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे. 12 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले. थिएटरमध्ये आपली जादू दाखवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील काही दिवसांपासून ओटीटीवर कधी रिलीज होणार, याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली होती.


'हनुमान' कधी आणि कोणत्या ओटीटीवर होणार प्रदर्शित ?


प्रशांत वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. आता चाहत्यांसाठी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत (HanuMan OTT Release Date Announced) आहे. हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटीवर 2 मार्चपासून चित्रपट पाहता येणार आहे. हा चित्रपट सर्व  भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे थिएटरमध्ये ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही आणि ज्यांना पुन्हा एकदा या चित्रपटाची जादू अनुभवायची आहे, अशांना चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. 






बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?


हनुमान चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 40 कोटी रुपये खर्च आला.  या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 235 कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी 8.05 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने हिंदी पट्ट्यातही 56.23 कोटी रुपयांची कमाई केली.


या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर झाली स्पर्धा


हनुमानसोबत इतरही दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामध्ये महेश बाबूचा 'गुंटूर करम', धनुषचा 'कॅप्टन मिलर', शिवकार्तिकेयचा 'आयलान' आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांना मागे टाकत 'हनुमान' हा आतापर्यंत 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 


चित्रपटाची कथा काय?


थेट प्रभू हनुमानाकडून सुपरपॉवर मिळणाऱ्या तरुणाची या चित्रपटात कथा आहे. सुपरपॉवर मिळाल्यानंतर हा तरुण लोकांच्या हक्कासाठी लढतो. तेजा सज्जा या अभिनेत्याने या तरुणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आणि तांत्रिक बाबीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. 


 इतर संबंधित बातम्या :