मुंबई : अभिनय विश्वाला कुठलं ग्रहण लागल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि हा प्रश्न उपस्थित होण्याचा कारण आहे अभिनय विश्वातील समोर येणारी काळी बाजू.. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे जाळे कसे पसरले आहेत हे सर्वांनाच कळलं तर आता टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रोस्टिट्यूशन रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हाय प्रोफाईल प्रोस्टिट्यूशन रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर यामध्ये आता टीव्ही इंडस्ट्रीमधील काही बडी नाव समोर येण्याची शक्यता आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमधील काही बड्या नावांची या रॅकेटमध्ये असण्याची शक्यता
दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हॉटेल सी प्रिन्सेस जवळ एक हाय प्रोफाईल प्रोस्टिट्यूशन रॅकेट (वेश्या व्यवसाय) उध्वस्त केले होते. ज्यामध्ये वेश्या व्यवसाय करता मुली पुरवणाऱ्या या ओटीटी आणि टीव्ही मालिकांमधील काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. तर जी महिला हे संपूर्ण रॅकेट चालवत होती ती सुद्धा एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. मात्र तिच्या चौकशीतून आता मोठे खुलासे होण्याची माहिती मिळत आहे. या प्रोस्टिट्यूशन रॅकेटमध्ये टीव्ही मालिकांमधील काही बड्या कलाकारांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ज्या महिलेला अटक करण्यात आली आहे तिने स्वतः काही वेब सिरीज आणि बॉलिवूड मधील बड्या कलाकारांसह सिनेमांमध्ये काम ही केलं आहे. तर ज्या महिला वेश्या व्यवसायासाठी पुरवल्या जाणार होत्या त्यापैकी एका महिलेने साबणाच्या जाहिरातीत काम केलं आहे तर दुसरी एका नामांकित मालिकेत काम केला आहे.
का ओढल्या जातात यात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील लोकं?
एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही एक मोठी आणि महागडी इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते. बहुतांश लोक अभिनय करण्याचा स्वप्न घेऊन मुंबईत येतात मात्र हे स्वप्न सत्यात कधी उतरेल याची माहिती नसते. पण तोपर्यंत टिकून राहण्यासाठी गरज असते ती बड्या कॉन्टॅक्टची आणि त्यांच्यामध्ये मिरवण्याची ज्यासाठी लागतो तो पैसा.. या इंडस्ट्रीमध्ये नेहमी काम मिळणे सुद्धा तारेवरची कसरत आहे. ज्यामुळे पैशाची चणचण नेहमीच भासत असते. वैश्या व्यवसायात अगदी सहज आणि जास्त पैसे मिळतात. ज्यामुळे स्ट्रगल करणाऱ्या मॉडल्स यांना या व्यवसायात ओढल जातात.
तर गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सुद्धा याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. हातात छोट मोठं काम होतं ते सुद्धा गेल्यामुळे आणि आपलं अस्तित्व आपलं मोठं कलाकार बण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत टिकवण्याकरिता वैश्या व्यवसायाकडे नवीन मॉडेल्सला वळावं लागलं ज्याचा फायदा काही बड्या नावांनी घेतला.
राज कुंद्राचं पॉर्न फिल्म रॅकेट पण या 2 वर्षात फोफावल होत आणि आता ह्या हाई प्रोफाइल प्रोस्टिट्यूशन रॅकेटमध्ये बड्या नावांची चर्चा होत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत .ही मोठी नाव नेमकी कोणती आहेत येणाऱ्या दिवसात ते स्पष्ट होईल.