नवी दिल्ली: समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले अमर सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. यावेळीही त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याद्वारे सर्वांचे लक्ष वेधलं आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पनामा पेपरचा उल्लेख करुन बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांना तुरुंगात जावं लागेल, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.


एबीपी न्यूजचे प्रतिनिधी आशीष सिंह यांना दिलेल्या या मुलाखतीत डिम्पल यादव आणि जया बच्चन यांच्या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. ते म्हणाले की, ''डिम्पल यादव यांना प्रियंका गांधींपेक्षा त्यांना जया बच्चन चांगल्या वाटतात. कारण पनामा पेपरमध्ये त्यांचंही नाव आहे. या यादीत मोहवेश जोकाटिया, दादी बलसारा आणि सरोज जयवाला यांचीही नावं आहेत. यातील सरोज जयवाला यांना कोर्टानं नोटीस बजावली, तर पनामा पेपर प्रकरणाची पूर्ण माहिती समोर येईल, आणि यानंतर अमिताभ बच्चन तुरुंगात जातील.''

अमर सिंहांची संपूर्ण मुलाखत पाहा



अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर यापूर्वीही टीकास्त्र सोडलं होतं. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे वेगवेगळे राहात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

संबंधित बातम्या: अमरसिंहांचा गौप्यस्फोट, अमिताभ-जया वेगवेगळे राहतात!