Pushpa 2 And Salaar Box Office Clash : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) आता पॅन इंडियाचे स्टार झाले आहेत. 'पुष्पा' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'पुष्पा 2' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सध्या 'बाहुबली' फेम प्रभास (Prabhas) सालार (Salaar) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रशांत नील (Prashanth Neel) या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. प्रशांत नीलचा 'केजीएफ 2' (KGF 2) सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच 'पुष्पा 2' आणि 'सालार' बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार असल्याचे म्हटले जात आहे. 


'पुष्पा 2' बिग बजेट सिनेमा 


'पुष्पा 2' सिनेमाच्या कथानकावर आता काम सुरू झाले आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीदेखील एन्ट्री होणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमावर काम करायलादेखील सुरुवात केली आहे. अद्याप या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झालेली नाही. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. 


लवकरच 'पुष्पा 2'च्या शूटिंगला होणार सुरुवात


'पुष्पा 2'चे शूटिंग डिसेंबर 2022 मध्ये होणार होते. पण आता जुलैमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे 2022 मध्ये सिनेमाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन होणार आहे. तर 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


बिग बजेट सिनेमे होणार 2023 मध्ये प्रद्रर्शित


प्रशांत नीलचा 'सालार' सिनेमा पुढील वर्षात म्हणजेच 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'सालार' सिनेमात प्रभास आणि श्रुती हासनची जोडी दिसणार आहे. 'सालार' हा सिनेमादेखील बिग बजेट सिनेमा आहे. तसेच अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'देखील बिग बजेट सिनेमा आहे. 


'पुष्पा' चित्रपटाचा पहिला भाग 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तर, दुसरा भाग नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा'चा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला कसा होईल, यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.


संबंधित बातम्या


Pushpa The Rule : कोट्यवधींचा गल्ला जमवल्यानंतर ‘पुष्पा 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार शूटिंग सुरु!


अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'पुष्पा 2'साठी तीन गाणी तयार