Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य अखेर देशपांडे सरांसमोर आले आहे. यश-नेहाने ही गोष्ट आजोबांपासून लपवून ठेवल्याने आजोबांना प्रचंड राग आला आहे. त्यामुळे आता यश नेहाच्या चाळीत राहायला जाणार आहे. 


यश जाणार नेहाच्या चाळीत राहायला


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत आता एक ट्विस्ट आला आहे. परीचे सत्य अखेर आजोबांसमोर आले आहे. त्यामुळे आजोबा प्रचंड नाराज झाले आहेत. घरातील सर्व मंडळी आजोबांची समजुत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आजोबा मात्र यश-नेहावर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यामुळे यश आता पॅलेससोडून चाळीत राहायला जाणार आहे.


परीचं पत्र वाचून आजोबांच्या मनाला फुटणार पाझर


आजोबांना परीचे सत्य माहित नसल्याने त्यांनी परीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. पण अखेर आजोबांसमोर परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य आले आहे. आजोबा घरातल्या कोणासोबत बोलायला तयार नसल्याने परीने आजोबांसाठी खास पत्र लिहिले आहे. प्रोमोमध्ये आजोबा परीचे पत्र वाचून पुन्हा एकदा परीच्या हाहात देताना दिसत आहेत. त्यामुळे परीचं पत्र वाचून आजोबांच्या मनाला पाझर फुटणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 




यश-नेहाचा पार पडणार साखरपुडा


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत यश, परी आणि नेहा तिघेही दिसून येत आहेत. साखरपुड्यादरम्यान नेहा आणि यशने पारंपारिक लूक केलेला दिसून येत आहे. 


श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : नेहा-यशचं होणार ग्रॅंड वेडिंग; लवकरच पार पडणार साखरपुडा


Majhi Tujhi Reshimgath : अखेर आजोबांनी केला नेहा आणि परीचा स्वीकार; पार पडणार साखरपुडा