Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या आगामी भागाची घोषणा केली. 'पुष्पा: द रूल' या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून शूटिंगदरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


'पुष्पा' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असणारी रश्मिका मंदानादेखील 'पुष्पा: द रूल'साठी उत्सुक आहे. निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कॅमेरामागची मंडळी काम करताना दिसत आहेत. 'पुष्पा: द रूल'चं शूटिंग जोरदार सुरू असल्याचा अंदाज फोटोमुळे येत आहे. 






'पुष्पा: द राइज' सिनेमातील अल्लू अर्जुनच्या कामाचे कौतुक झाले होते. अल्लूचे सिनेमातील 'झुकुंगा नही' सारखे डायलॉग खूपच लोकप्रिय झाले होते. रश्मिका मंदानाच्या कामाचंदेखील कौतुक झालं होतं. दोघांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं होतं. आता पुन्हा एकदा 'पुष्पा: द रूल' या सिनेमात त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


'पुष्पा: द राइज' या सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमारने केलं होतं. तर 'पुष्पा: द रूल'च्या दिग्दर्शनाची धुरादेखील सुकुमारचं सांभाळणार आहेत. या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील डायलॉग, कथानक आणि सिनेमातील गाण्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  


'पुष्पा: द रूल'चे बजेट 500 कोटी


'पुष्पा: द रूल' या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे. निर्माते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 500 कोटी खर्च करणार आहेत. हा सिनेमा 10 भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने प्रेक्षक 'पुष्पा: द रूल'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच सिनेमागृहात 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा धमाका करणार आहे. 


संबंधित बातम्या


Pushpa 2 : अल्लू अर्जुन अन् रश्मिका मंदान्नाची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार; 'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात