2022 Lakme Fashion Week : मुंबईत नुकताच लॅक्मे फॅशनवीक हा शो पार पडला. या शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला. यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरापासून हुमा कुरशीपर्यंत अनेक अभिनेत्रींना आपला बोल्ड जलवा दाखवला. हुमा कुरेशीने सुप्रसिद्ध डिझायनर नचिकेत बर्वेसोबत रॅम वॉक केला. जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन, त्यांची नात नव्या नवेली, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पत्नी सुनीता गोवारीकर आणि मनीष मल्होत्रा ​​यांच्यासह नचिकेत बर्वेचा शो पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती.
 
मैने प्यार किया या चित्रपटातून लोकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री ग्लॅमरच्या दुनियेत परतली आहे. भाग्यश्रीने पारंपरिक साडी परिधान करून लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर चालून चाहत्यांची मने जिंकली. दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील लवकरच चित्रपटसृष्टीत आपले नशीब अजमावण्याच्या तयारीत आहे.  अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी बबिलची स्टायलिश स्टाईल रॅम्पवर पाहायला मिळाली. 






अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण  शमिता शेट्टी फ्लोरल थीम शो रॅम्पवर चालताना खूप आनंदी दिसली. त्याचवेळी अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अलाया एफ. वेस्टर्न आउटफिटमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. गेल्या अनेक वर्षांपासून करीना कपूर लॅक्मे फॅशन वीकच्या फिनालेमध्ये रॅम्पवर आपला जलली दाखवत होती. परंतु यावेळी ही संधी मिळाली सुपरहिट चित्रपट सितारामम फेम मृणाल ठाकूरला. मृणालची अनोखी शैली लोकांना खूपच आवडल्याचे पाहायला मिळाले.  





 
अभिनेत्री मलायका अरोराने देखील लॅक्मे फॅशनवीक या शोमध्ये आपला जलवा दाखवला. परंतु, यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या आरोपांना सामोरे जावे लागल्यानंतर आणि काही काळ तुरुंगात घालवल्यानंतर रिया चक्रवर्ती बराच काळ कॅमेरापासून दूर राहिली. पण लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर तिने अतिशय आत्मविश्वासाने आपले कसब दाखवले. रिया चक्रवर्ती पाश्चिमात्य पोशाखात खूपच सुंदर दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिचा भूतकाळ मागे सोडण्याचा संकेत देत होता.  
 
स्टार क्रिकेटर म्हणून आपला ठसा उमटवणारा शुभमन गिल लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर अनोख्या  स्टाईलमध्ये दिसला.  प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेल्या फॅशनप्रेमींनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिली.