Pushpa 2: सुपरस्टार  अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा: द राइज  या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  आता पुष्पा-2  या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. 


'पुष्पा 2' च्या ऑडिओ राइट्सची किंमत


रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी  विकले गेले आहेत. 'पुष्पा 2' चे ऑडिओ राइट्स  65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.  एका रिपोर्टनुसार, साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' आणि 'R R R' या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ऑडिओ राइट्स सुमारे 10 कोटी ते 25 कोटींमध्ये विकले गेले होते.  त्यामुळे आता 'बाहुबली 2' आणि 'R R R'  या चित्रपटांचे ऑडिओ राइट्स प्राइजचे रेकॉर्ड पुष्पा-2 या चित्रपटानं तोडलं आहे. 


काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. दोघांच्याही लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. 


पुष्पा-2 या चित्रपटातील लूकचा फोटो अल्लू अर्जुननं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खास लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुनच्या गळ्यात लिंबाची माळ दिसत आहेत. तसेच या फोटोमध्ये त्यानं भरजरी साडी देखील नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी अशा अल्लू अर्जुनच्या लूकनं त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 






पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  पुष्पा द राइज  या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  'मैं झुकेगा नहीं साला', 'फ्लावर नहीं फायर है'  या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सनं तर प्रेक्षकांना वेड लावलं.पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2:  तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ