Allu Arjun birthday: अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साउथ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचा आज 41 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अल्लू अर्जुनकडे अनेक लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. तसेच त्याच्याकडे 7 कोटींची व्हॅनिटी आणि प्रायव्हेट जेट देखील आहे. जाणून घेऊयात अल्लू अर्जुनच्या संपत्तीबाबत...
व्हॅनिटी व्हॅन अल्लू अर्जुनकडे कस्टमाइज व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनमध्ये टीव्ही, फ्रीज आणि रिक्लिनर यांसारख्या वस्तू आहेत. शूटिंग दरम्यान अल्लू अर्जुन हा अनेकदा त्याच्या आलिशान व्हॅनमध्ये बसतो या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये आहे.अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन 2019 मध्ये खरेदी केली होती. या ब्लॅक कलरच्या या व्हॅनिटी व्हॅनचं नाव 'द फाल्कन' असं आहे. यावर अल्लू अर्जुनच्या नावाचं इनिशिअल 'AA' देखील लिहिलं आहे.
100 कोटींचे घरअल्लू अर्जुनचे हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. या घरामध्ये अल्लू अर्जुन हा आई-वडील, पत्नी अल्लू स्नेहा आणि मुले अरहा आणि अयान यांच्यासोबत राहतो.त्याच्या घरात स्विमिंग पूल, जिम, होम थिएटर आणि मुलांसाठी खेळण्याची जागा इत्यादी आहे.
Hummer H2अल्लू अर्जुनकडे Hummer H2 नावाची लग्झरी कार आहे.या कारची किंमत 75 लाख रुपये आहे.तसेच Hummer H2 बरोबरच अल्लू अर्जुनकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे रेंज रोव्हर ही गाडी देखील आहे. ही गाडी त्यानं 2019 मध्ये खरेदी केली. या गाडीला त्यानं बिस्ट असं नाव दिलं. त्याच्याकडे जग्वार Jaguar XJL ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 1.2 कोटी आहे. तसेच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे.
अल्लू अर्जुनचे आगामी चित्रपट
अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याचा पुष्पा द रुल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा द रुल चित्रपटामधील अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :