मुंबई : डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर आणि कलाकारांची मुलं कलाकारच होतात, असा समज आहे. मात्र याला अभिनेत्री अलका आणि समीर आठल्ये यांची मुलगी इशानी अपवाद ठरली आहे. कारण करिअरचा वेगळा मार्ग निवडत ती वैमानिक झाली आहे. वयाच्या 23 व्या वर्षीच तिने हे यश मिळवलं आहे.

इशानीला व्यवसायिक वैमानिकाचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे लहानपणापासून वैमानिक होण्याचं बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याने इशानीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

इशानीने 2015 सालीच अमेरिकेत व्यवसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला होता. मात्र तिला भारतात यायचं होतं म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आणि अखेर भारतातही परवाना मिळवला.