मुंबई : बाहुबली सिनेमा पाहताना तुमच्या डोक्यात एक प्रश्न नक्कीच आला असेल की अमरेंद्र, महेंद्र बाहुबलीपासून भल्लाल देव, कटप्पा यांच्या कपाळावर वेगवेगळी चिन्हं रेखाटलेली आहेत. पण याच्यामागे एक मोठं कारण आहे, जे त्यांच्या व्यक्तिरेखेशी जुळतं. जाणून घेऊया या चिन्हांचा अर्थ...


1. अमरेंद्र बाहुबली :


देवसेनासाठी माहिष्मतीचं सिंहासन धुडकावणाऱ्या अमरेंद्र बाहुबलीच्या कपाळावर अर्धचंद्र रेखाटलेलं आहे. याचा अर्थ आहे दयाळू आणि शांतताप्रिय. अमरेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखाही अशीच होती. कालकेयसोबत युद्धादरम्यान त्याने प्रजेची रक्षा करणं हाच खरा धर्म मानला. याशिवाय सिनेमात आणखीही अशी दृश्यं आहेत, ज्यावरुन अमरेंद्र बाहुबलीच्या दयाळूपणाची उदाहरणं पाहायला मिळतात.

2. महेंद्र बाहुबली :


महेंद्र बाहुबली म्हणजे शिवाच्या कपाळावर शिवलिंग बनलेलं आहे. याचा अर्थ ताकद आणि साहस. महेंद्र बाहुबली भगवान शंकरचा भक्त असतो. सिनेमाच्या पहिल्या भागात आपण महेंद्र बाहुबलीला खांद्यावर शिवलिंग उचलताना पाहिलंच आहे.

3. कटप्पा :


कटप्पाचच्या कपाळावर बनलेलं चिन्ह समजणं थोडं कठीण आहे. कारण दिग्दर्शकाने ते फार वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलं आहे. पण थोडी पडताळणी केल्यानंतर समजलं की, या चिन्हाचा अर्थ आहे 'गुलामी'. कटप्पाा हा माहिष्मती राज्याचा प्रामाणिक गुलाम असतो.

4. भल्लालदेव :


भल्लालदेवच्या माथ्यावर बनलेलं सूर्याचं चिन्हं हे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतिक आहे. त्याचवेळी तो अतिशय धूर्तही आहे. 'बाहुबली 2' मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की, कट कारस्थान करुन तो माहिष्मेतीच्या सिंहासनावर बसतो. यासाठी तो अमरेंद्र बाहुबलीलाही मारुन टाकतो.

5. शिवगामी :


शिवगामीच्या कपाळावर लाल रंगांची मोठी टिकली दिसते. याचा अर्थ आहे की, सकारात्मक वृत्ती आणि उत्तम शासक. शिवगामीने माहिष्मतीवर अनेक वर्ष राज्य केलं होतं. सिनेमातील शिवगामीचा एक डॉयलाग फारच प्रसिद्ध झाला. तो म्हणजे 'मेरा वचन ही हैं शासन. सिनेमातील शिवगामीचा आब आणि तोरा पाहता हे टिकली तिला तंतोतय योग्य ठरते.

6. देवसेना :


देवसेनाच्या टिकलीचा अर्थ आहे 'जेंडर इक्वॉरलिटी' म्हणजेच स्त्री-पुरुष समानता आणि ते योग्य असल्याचंही सिद्धही झालं आहे. देवसेना केवळ अमरेंद्र बाहुबलीची पत्नी च नाही तर एक योद्धाही आहे, जी आपल्या राज्याहच्या सुरक्षेसाठी हातात तलवार घेते. त्यामुळे देवसेनाची टिकली तिच्या व्यक्तिरेखेला पूर्णत: न्याय देते.

7. अवंतिका :


अवंतिकाच्या कपाळावर शंकूच्या आकाराची टिकली आहे. ज्याचा अर्थ आहे ताकद आणि चपळता. सिनेमात अवंतिका एक योद्धा बनली आहे, जी देवसेनाला सोडवण्यासाठी लढाई करते.

8. बिज्जल देव :


बिज्जदल देवच्या कपाळावर त्रिशूळ बनलेलं आङे. याचे तीन अर्थ होतात, पहिला निर्मिती, दुसरा देखरेख आणि तिसरा नाश. मात्र बिज्जाल देवची जशी व्यक्तेरेखा होती, ती केवळ नाशासोबतच जोडली जाऊ शकते.