मुंबई : अभिनेत्री सनी लिऑनची आपल्या आगामी 'बेईमान लव्ह' सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आता सिनेमा प्रमोट करण्यात पूर्ण टीम गुंतली असताना, सनी लिऑनने मात्र प्रमोशनपासून चार हात लांब राहण्याचच प्रयत्न केला आहे. याचं कारणही धक्कादायक आहे.

 

सनी लिऑनने आपल्या करिअरची सुरुवात पॉर्न फिल्ममधून केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली आणि इथे बऱ्यापैकी यशस्वीही झाली. आता सनीने पॉर्न फिल्ममध्ये काम करणं बंद केलं असलं, तरी बॉलिवूडमध्येही तिच्या आधीच्या प्रतिमेला अनुसरुनच भूमिका मिळताना दिसत आहेत.

 

एका वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, 'बेईमान लव्ह' हा सिनेमाही अत्यंत बोल्ड आहे. यामध्ये सनीने इंटिमेट सीन्स दिले आहेत. शिवाय, एका यशस्वी महिलेची भूमिकाही निभावली आहे. मात्र, तरीही सनी लिऑन या सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे.

 

यावर बोलताना सनी लिऑनने सांगितले, "बेईमान लव्ह सिनेमा शूटिंगनंतर पाहिल्यावर आवडला नाही. त्यामुळे प्रमोशनसा सनी लिऑनन हजेरी लावणार नाही. इमेज बदलण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रयत्नात 'बेईमान लव्ह' अडथळा आणू शकतो, त्यामुळे प्रमोशनमध्ये सहभागी होत नसल्याचे सनी लिऑन सांगते.