मुंबई : संवेदनशील विषयांवर आधारित सिनेमे बनवणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'राझी' असे सिनेमाचं नाव असून, अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. गुप्तहेराच्या (स्पाय) आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. सत्य कथेवर आधारित हा सिनेमा असल्याचे ट्रेलरमधूनच सांगण्यात आले आहे.


प्री-ट्रेलर आणि तीन पोस्टर्सनंतर अखेर 'राझी' सिनेमाचा संपूर्ण ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशातील वादाची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. आलिया भट्टने गुप्तहेराची भूमिका यात साकारली आहे. पाकिस्तानी सैनिकासोबत आलिया लग्न करुन पाकिस्तानात जाते आणि तिथून भारतासाठी माहिती मिळवण्याचे काम करते. ज्या पाकिस्तानी सैनिकासोबत आलियाचं लग्न होतं, त्याची भूमिका अभिनेता विकी कौशलने केली आहे. एका धाडसी तरुणीची भूमिका आलियाने यात केली आहे.

पुढील महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा दिग्दर्शित होणार आहे. आलिया भट्टचा अफलातून अभिनय ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधून घेतो. त्यात मेघना गुलजारसारख्या दिग्दर्शिकेचा सिनेमाला असलेला मोठा स्पर्श. त्यामुळे 'राझी' सिनेमाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असणार, हे नक्की.

'राझी' सिनेमाचा ट्रेलर :