Alia Bhatt: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लवकरच हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी आलिया भट्टला ट्रोल केलं आहे.
आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या मुलाखतीच्या व्हायरल व्हिडीओमधील आलियाच्या Body Language ला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, आलिया अनेकवेळा तिच्या केसांना हात लावते, तसेच हातामधील रिंग काढते. मुलाखतीदरम्यान आलियाची देहबोली ही एखाद्या प्रोफेशनल अॅक्टर प्रमाणे नव्हती, असं नेटकऱ्यांचे मत आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाच्या टीमच्या मुलाखतीच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आलियाची देहबोली विचित्र वाटत आहे. ती प्रोफेशनल वाटत नाही.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आलियाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच विचित्र आहेत'. 'आलिया, घरी जा' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली आहे.
पाहा व्हिडीओ:
आलियाचा हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स (Netflix) या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तसेच आलिया ही लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या हिंदी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंह यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: