Alia-Ranbir Welcome Baby Girl: अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता  रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते तसेच काही सेलिब्रिटी हे रणबीर आणि आलियाला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही मीम्स देखील व्हायरल होत आहेत. या मीम्समधून काही नेटकऱ्यांनी हटके पद्धतीनं आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.  


पाहा मीम्स: 


एका नेटकऱ्यानं 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या पोस्टरवर आलियाचा फोटो एडिट करुन एक मीम तयार केलं आहे. हे मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मीमला अभिनेता अमेय वाघनं लाफ्टर इमोजी शेअर करुन कमेंट केली आहे. 






एका  व्हायरल मीममध्ये तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी दिसत आहेत. या मीमला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, '18 एप्रिल 2022 रोजी लग्न मुलीचा जन्म सहा नोव्हेंबर रोजी हे मिळून केवळ सहा महिने आणि तेवीस दिवस होतात. हे गणित काही कळत नाही.'






एका व्हायरल मीममध्ये करण जोहरचा डान्स करत असतानाचा एक व्हिडीओ दिसत आहे. या व्हिडीओला देण्यत आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'आलिया आणि रणबीरला मुलगी झाली. त्यानंतर करण जोहर....'






एका नेटकऱ्यानं शेअर केलेल्या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या ट्वीटमध्ये त्या युझरनं लिहिलं, 'आलिया आणि रणबीर कपूर यांना शुभेच्छा कारण त्यांच्या मुलीला करण जोहर त्याच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटात कास्ट करेल.'










वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Alia-Ranbir Welcome Baby Girl: माधुरी दीक्षित,अक्षय कुमार अन् अनुष्का शर्मा; आलिया रणबीरला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा