Alia Bhatt : गंगुबाई काठियावाडी चित्रपटामुळे अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. गंगुबाई काठियावाडीमुळे आलियाने दीपिका पदुकोणला देखील मागे टाकले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलियाच्या कारकिर्दीतील एक मोठा मैलाचा दगड ठरला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, हीच आलिया आलिशान जीवनशैली जगत आहे. तिचे कार प्रेम पाहून चाहते आश्चर्य चकित झाले आहेत.
आलिया भट्ट केवळ अभिनेत्री नाही तर तिने स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे. त्यामुळे तिने स्वत:ला निर्मातीही बनवले आहे. मुंबईत राहणारी आलिया आलिशान जीवनशैली जगते. ती गेल्या 10 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. यामुळे आलियाने विलासी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी साध्य केल्या आहेत. सुंदर घर आणि आलिशान कारची ती हौशी आहे. आलियाकडे लाखो ते कोटींच्या कार आहेत.
लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग
आलिया भट्टच्या गॅरेजमधील सर्वात महागडी आणि आलिशान कार लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग आहे. या कारची किंमत करोडोंमध्ये आहे. 2.31 कोटी रुपयांपासून सुरू होणाऱ्या या कारची किंमत 3.41 कोटी रुपये आहे.
ऑडी Q 7
बहुतेक बॉलिवूड स्टार्सकडे ही कार आहे. म्हणजेच ऑडीचे हे मॉडेल जवळपास सगळ्यांनाच आवडले आहे. पूर्णपणे स्वयंचलित या कारची किंमत सुमारे 80 लाख रूपये आहे. आलिया अनेकदा या कारमधून प्रवास करत असते.
ऑडी A6
ऑडी Q 7 सोबतच आलियाकडे ऑडी 6 देखील आहे. 58 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या कारची किंमत 64 लाखांपर्यंत आहे.
ऑडी Q 5
आलिया भट्टने जेव्हा तिच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा आलिया या कारमध्ये सर्वाधिक स्पॉट असायची. म्हणजेच ही आलियाची राईड होती.
महत्वाच्या बातम्या