Akshaya Deodhar Hardeek Joshi First Mangalagaur Photo : मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लग्नबंधनात अडकले असून लग्नानंतरचा प्रत्येक सण ते जल्लोषात साजरा करत आहेत. आता अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मंगळागौर खूपच थाटामाटात साजरी झाली आहे. शाही मंगळागौरीदरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


अक्षया आणि हार्दिकने मंगळागौरी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे,"मंगळागौर पुजन". अक्षया-हार्दिकच्या या फोटोंवर लक्ष्मी-नारायणाचा जोडा, अहा.., राणाचा पाठकबाई एक नंबर, पहिल्या मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा, तुझ्यात जीव रंगला, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत".






पहिल्या मंगळागौरीसाठी अक्षयाचा खास लूक


अक्षयासाठी पहिली मंगळागौर खूपच खास होती. लाडक्या सुनेच्या पहिल्या मंगळागौरीसाठी हार्दिकच्या घरच्यांनी खास तयारीदेखील केली होती. या समारंभासाठी अभिनेत्रीने सोनेरी रंगाची बनारसी साडी, हातावर मेहेंदी, हातात सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि श्रृंगार केला होता. तर दुसरीकडे हार्दिकने अक्षयाच्या रंगाला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. 


मंगळागौरीसाठी अक्षयाची स्पेशल मेहंदी


पहिल्या मंगळागौरीसाठी अक्षयाने खास मेहंदी काढली आहे. अक्षयाने मेहंदी काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या मेहंदीवर 'अक्षयाची मंगळागौर' असं लिहिलेलं दिसत होतं. तसेच तिने मेहंदीमध्ये 'महामृत्युंजय मत्र'देखील काढला होता. एकंदरीतच पहिल्या मंगळागौरसाठी अक्षयाने जय्यत तयारी केली होती.
 
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांचा पारंपारिक विवाहसोहळा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. राणदा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाल्याने त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.


'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर मुख्य भूमिकेत होते. त्यांची ही मालिका आणि राणा दा आणि पाठक बाईंची जोडी प्रचंड गाजली. या मालिकेच्या माध्यमातून दोघे घराघरांत पोहोचले. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.


संबंधित बातम्या


Akshaya Deodhar: अक्षयाची पहिली मंगळागौर; अभिनेत्रीच्या हातावर रंगली मेहंदी, शेअर केला खास व्हिडीओ