मुंबई : अक्षय कुमारचा 'रुस्तम' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सिनेमातील अक्षयचा अभिनय आणि कथा प्रेक्षकांना आवडत आहे. चित्रपटात अक्षय एका नेव्ही अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मात्र या सिनेमात अनेक चुका आहेत. या चुका त्याच्या नेव्हीच्या वर्दीतील आहे, जे पाहून नौदलाचे अधिकाऱ्यांनाही धक्का बसेल.
'रुस्तम'च्या वर्दीतील 8 चुका...
'रुस्तम' सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. मात्र सत्य घटनेवर सिनेमा बनवताना बॉलिवूड दिग्दर्शक अनेकदा रिसर्चमध्ये कमी पडतात. रुस्तमच्या टीमने केस स्टडी तर केली, पण नौदलाच्या नियमांचा नीट अभ्यास केलेला नाही. रुस्तम पावरीची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारच्या वर्दीत एक-दोन नव्हे तर 8 मोठ्या चुका आहेत. इंडिया टुडेचे माजी संपादक संदीप उन्नीथन यांनी ट्विटवर याची माहिती दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SandeepUnnithan/status/765190813592715264
- सिनेमाची कहाणी 1959 मधील आहे, पण सिनेमाचे सेट आणि वर्दी पाहता ते 1959 मधले असल्याचं जाणवत नाही.
- नौदलाच्या अधिकाऱ्यांना दाढीशिवाय मिशी ठेवण्याची परवानगी 1971 नंतर मिळाली आहे. तर अक्षय सिनेमात केवळ मिशी असलेल्या लूकमध्येच दिसतो.
- अक्षयने वर्दीवर जे बॅज लावले आहेत, ते कारगील 1999 मधील आहे.
- तसंच यावरील मेडलही कारगीलचंच आहे.
- अक्षयच्या वर्दीत बार कर्ल रिव्हर्स दाखवण्यात आलं आहे, जे नियमांच्या विरोधात आहे.
- ओपी पराक्रम मेडल हे तर 2001-2002 मध्ये देण्यास सुरु झालं.
- 1970 नंतर नेम टॅग अर्थात नावाची पट्टी वर्दीवर लावण्यास सुरुवात झाली.
- सिल्व्हर जुबली मेडल 1972 नंतर देण्यास सुरुवात झाली. मात्र सिनेमाची कथा 1959 मधील असूनही अक्षयच्या वर्दीवर हे मेडल दिसतात.
- तर नेव्हीमधील जवानांना लाँग सर्व्हिसेस मेडलही 1972 नंतरच देण्यात सुरुवात झाली.