Akshay Kumar Upcoming Movie : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) चे सर्व आगामी चित्रपट इंटरेस्टिंग असणार आहेत. अक्षय कुमारने आतापर्यंत त्याच्या काही आगामी चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यात 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' सारख्या सिनेमांचा समावेश करता येईल. सध्या अक्षय कुमार दिल्लीतील चांदणी चौकात त्याचा आगामी सिनेमा "रक्षा बंधन"ची शूटिंग करत आहे. अक्षय कुमार ऑक्टोबर महिन्यातच रक्षाबंधन सिनेमाची शूटिंग करणार आहेत. तसेच सिंड्रेला सिनेमाचे देखील
तो शूटिंग संपविण्याचा प्रयत्न करणार आहे.


अक्षय कुमार लंडनमध्ये सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करुन आगामी रक्षा बंधन सिनेमाच्या शूटिंगसाठी दिल्लीत रवाना झाला होता. कलाकार या चित्रपटाचे शूटिंग 15 ऑक्टोबरपर्यंत संपवणार आहेत. त्यानंतर सिंड्रेला सिनेमातील उरलेले शूटिंग करण्यासाठी ते शिमल्याला रवाना होणार आहेत. सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच अक्षय Oh My God चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 


अक्षय कुमार आता 15 दिवस Oh My God सिनेमाचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर राम सेतुवर काम सुरू करणार आहेत. अक्षय कुमार राम सेतु चित्रपटाची शूटिंग  15 नोव्हेंबरपासून श्रीलंकेत करणार आहेत. जानेवारीत अक्षय कुमार दिग्दर्शित राज मेहताच्या ड्राइविंग लायसेंस चित्रपटाची सुरुवात होणार आहे. तसेच पाइपलाईनमध्ये 
एक विनोदी चित्रपटदेखील आहे. एका मुलाखतीत येत्या वर्षात अनेक सिनेमे करणार असल्याची माहिती अक्षय कुमारने दिली आहे. मी असा अभिनेता आहे की मला पात्र आत्मसात करायला अनेक महिने लागतात. मी एक चित्रपट हाताच घेतो त्याचे शूटिंग संपवतो. मगच दुसरा प्रोजेक्ट हातात घेतो. मी चोवीस तासातील आठ तास काम करतो.


जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.