Mumbai Drugs Case Update : आर्यन खानच्या ड्रग्ज अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक मोठी मंडळी शाहरूख खानचे समर्थन करत आहेत. चित्रपट निर्माते हंसल मेहतादेखील शाहरूख खानचे समर्थन करताना दिसून येत आहेत. हंसत मेहता म्हणाले, "आई-वडिलांसाठी ही अतिशय दुर्दैवी बाब आहे".


हंसल मेहताने शाहरुखच्या समर्थनासाठी केले ट्वीट


शाहिदसारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे हंसल मेहता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शाहरुख खानचे 
समर्थन करणारी पोस्ट लिहिली आहे, "आई-वडिलांना जर त्यांच्या मुलांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे. त्यातही लोकं जर कायदेशीर प्रक्रिया होण्याआधीच निर्णय घेत असतील तर ते चूक आहे. आई-वडिल आणि मुलांच्या नात्यासाठी ते अपमानकारक आणि चुकीचे ठरू शकते. मी शाहरुख खानच्या सोबत आहे"






हंसला मेहताच्या आधीही पूजा भट्ट, सुचित्रा कृष्णमूर्ति आणि सुनील शेट्टी यांनीदेखील आर्यन खानचे समर्थन केले आहे. बॉलिवूडचा सलमान खानदेखील शाहरुखला भेटायला 'मन्नत' या त्याच्या बंगल्यावर रात्री उशिरा पोहोचला होता. 


मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.


सुनील शेट्टी म्हणाले.. आता तपास सुरू आहे
शेट्टी पुढे म्हणाले, की "मला वाटते की या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. मुलाला आता श्वास घेण्याची संधी द्या. जेव्हाही आमच्या चित्रपट इंडस्ट्रीत काही घडते तेव्हा मीडिया तुटन पडतो. प्रत्येकाला वाटतं की हे असच असेल. मुलाला रिपोर्ट करण्याची एक संधी द्या, जेणेकरून सत्य बाहेर येईल. जोपर्यंत तो लहान आहे, त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे."