मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाची अक्षयच्या चाहत्यांना उत्सुकता असतानाच, आणखी एक खुशखबर आहे.
अभिनेता अक्षय कुमार आगामी सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवला जाणार आहे. या सिनेमात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी यांसारखे दिग्गज कलाकार असतील, असेही बोलले जात आहे.
‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या अक्षय कुमार व्यस्त आहे. या सिनेमासंदर्भातच अक्षय कुमार पंतप्रधान मोदी यांनाही भेटला होता.
अक्षय कुमार हा 'मि. क्लीन' आहे. त्यामुळे पंतप्रधानांची भूमिका त्याला शोभेल, असे भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. शिवाय, “पंतप्रधानांची भूमिका अक्षय कुमारशिवाय उत्तमपणे कुणीच करु शकत नाही.”, असे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले.