Akshay Kumar Metro Ride : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा तो त्याच्या अभिनयामुळे आणि बॅक टू बॅक सुपरहिट होणाऱ्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. अशातच अक्षयने आता मुंबई मेट्रोने प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


अक्षयने मेट्रोने केला प्रवास


अक्षय कुमारने मुंबई मेट्रोने प्रवास केला आहे. त्याचा प्रवासादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी घातलेल्या अक्षयच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 



अक्षय कुमारने 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी मुंबईत मेट्रोने प्रवास केला आहे. याआधीदेखील त्याने 2023 च्या सुरुवातीला 'सेल्फी' (Selfiee) सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान इमरान हाशमीसोबत (Emraan Hashmi) मेट्रोने प्रवास केला आहे. त्यावेळी त्याने चाहत्यांसोबत "मैं खिलाडी तू अनाडी' या गाण्यावर डान्स केला. 


अक्षयच्या लूकने वेधलं लक्ष (Akshay Kumar Look)


अक्षय कुमारने ब्लॅक लूक केला होता. त्यावर त्याने पांढऱ्या रंगाचे शूज परिधान केले होते. लूकला आणखी चांगलं करण्यासाठी अक्षयने डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली होती. तसेच त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. साध्या लूकने अक्षयने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


सकाळी-सकाळी अक्षयला मेट्रोमध्ये पाहून चाहतेही हैरान झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपण अक्षय कुमारसोबत मेट्रोने प्रवास करत आहोत, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. 


अक्षय कुमार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहे. पण गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तो कमी पडला आहे. आता अक्षयच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


अक्षय कुमारच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या..


खिलाडी आता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमात झळकणार आहे. 'सिंघम अगेन' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. अक्षयसह या सिनेमात अजय देवगन, करीना कपूर खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि टायग श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 


अक्षयने अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 'स्काय फोर्स' हा त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच अभिनेत्याचे 'वेलकम टू द जंगल', 'बडे मिया छोटे मिया','हाऊसफुल्ल 5' आणि 'सिंघम अगेन' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.