VIDEO : अक्षय कुमारची आयपीएस अधिकाऱ्यांसोबत फाईट
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2016 06:15 AM (IST)
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचे सिनेमांतील थरारक स्टंस्ट पाहून अनेक जण थक्क होतात. चित्रपटात, पोलिस, आर्मी किंवा नेव्ही ऑफिसरची भूमिका साकारणाऱ्या खिलाडी कुमारने मंगळवारचा दिवस नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसोबत घालवला. यावेळी त्याने अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. इतकंच नाही तर त्यांना स्वत:चं फायटिंग कौशल्यही दाखवलं. अक्षय कुमार स्वत: मार्शल आर्ट एक्स्पर्ट आहे. हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसोबत त्याने बातचीत केली, व्हॉलिबॉल खेळला आणि एका अधिकाऱ्यासोबत फाईटही केली. फायटिंगचा हा व्हिडीओ अक्षय कुमारने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. https://twitter.com/akshaykumar/status/725002719333765121 अक्षय कुमारचा आगामी 'रुस्तम' सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असून त्यात तो नेव्ही ऑफिसरची भूमिकेत दिसेल. जूनमध्ये रिलीज होणाऱ्या 'हाऊसफूल 3' मध्येही अक्षय रितेश आणि अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.