मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि सध्या लेखनाचं काम करत असलेली ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे. ती आज 47 वर्षाची झालीय. यानिमित्तानं अक्षय कुमारनं तिला वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर ट्विंकल सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघेही सायकलिंग करायला बाहेर पडलेले आहेत आणि हसताना दिसत आहेत.

Continues below advertisement


अक्षय कुमारने हा फोटो शेअर करत लिहलंय की, "जीवनातल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आणखी एक वर्ष, परंतु याचा मला आनंद आहे की जीवनातले सगळे निर्णय मला तुझ्या सोबतीनं घ्यायची संधी मिळाली." या फोटोत ट्विंकल बोट नेट स्वेटर आणि डेनिम आउटफिटमध्ये दिसत आहे तरअक्षय कुमारने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातल्याचं दिसतंय.





चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोवर त्याच्या आणि ट्विंकलच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आणि ट्विंकलला शुभेच्छा दिल्या आहेत. काही लोकांनी त्यांची ही जोडी बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी असल्याचं सांगितलं आहे. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारने 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'इंटरनॅशनल खिलाडी' आणि 'जुल्मी' या चित्रपटात एकत्रित काम केलं आहे. या दरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढली होती.


2001 साली विवाहबंधनात
चित्रपट क्षेत्रात काही खास करिअर करु न शकलेल्या ट्विंकलने 2001 साली अक्षय कुमारशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आरव आणि नितारा अशी त्यांची नावं आहेत. 2009 साली 'पीपल' मॅगेझिनने ट्विंकल खन्नाला भारताची चौथी बेस्ट डेस्ड सेलिब्रिटीचा पुरस्कार दिला होता.


संबंधित बातम्या: