मुंबई : अभिनेता अक्षय कुमार बॉलिवुडमध्ये 'खिलाडी कुमार' नावाने प्रसिद्ध आहे. अक्षयच्या सिनेमातील जबरदस्त अॅक्शन, स्टंट सीनमुळे त्याला ही ओळख मिळाली आहे. अक्षयने पुन्हा त्याच्या नावाला साजेसा असा स्टंट केला आहे. अक्षयने मोठ्या हिमतीने स्वत:ला आग लावून घेत अंगावर काटा येईल असा स्टंट आपल्या चाहत्यांसाठी सादर केला.
अक्षय मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. अक्षयला आयोजकांनी स्टेजवर येण्याची विनंती केली, त्यावेळी अक्षयने त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये स्टेजवर एन्ट्री घेतली. अक्षयने कपड्यांवर आग लावली आणि स्टेजवर एन्ट्री घेतली होती. उपस्थितांना काही वेळ स्टेजवर नेमकं काय घडतंय काही कळायला मार्ग नव्हता.
अक्षय कुमारने असे स्टंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अक्षयचे विविध स्टंटचे व्हिडीओ समोर आले आहे. मात्र अभिनेते ज्यावेळी असे स्टंट करतात त्यावेळी त्यांच्यासोबत स्टंट मास्टर्स आणि एक्सपर्ट्स सोबत असतात. त्यामुळे कुणीही असे स्टंट घरी करु नयेत.
अक्षय सध्या त्याच्या 'केसरी' सिनेमामध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.