अक्षय सध्या कुटुंबीयांसोबत सुट्टीवर अमेरिकेत आहे. त्याने ट्विटरवरून 'फरवहर' भेट मिळाल्याची माहिती देऊन, त्याचा फोटो शेअर केला आहे.
न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमधील पारसी समुदायाने ही अनोखी भेट दिल्याबद्दल त्याने पारसी समाजाचे आभार मानले आहेत. तसचे त्याचा आगामी चित्रपटा रुस्तमसाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले आहेत.
अक्षयने आणखीन एक फोटो ट्विट करून आपल्या सुट्ट्या संपल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये तो आपली मुलगी नितारासोबत आहे.
टीनू सुरेश देसाईने दिग्दर्शित केलेला रुस्तम हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून या चित्रपटात अक्षयसोबत इलियाना डिक्रूज आणि ईशा गुप्ता काम करत आहेत.