मुंबई : 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला आशु अर्थात पुष्कराज चिरपुटकर बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घ्यायला सज्ज आहे. 'बुधिया सिंह - बॉर्न टू रन' या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत आहे.

 

 

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी, 50 डिग्री तापमानात पुरी ते भुवनेश्वर हा 65 किलोमीटरचा प्रवास केवळ 7 तास 2 मिनिटांत धावत पूर्ण करणाऱ्या बुधिया सिंहच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. सौमेंद्र पढी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 5 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 

 

बुधिया सिंहच्या भूमिकेत पुण्याचा बालकलाकार मयुर पाटोळे असून मनोज वाजपेयी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. तर पुष्कराज पत्रकाराच्या व्यक्तिरेखा रंगवताना दिसणार आहे. याशिवाय चित्रपटाततर श्रुती मराठेही या सिनेमात लक्षवेधी भूमिकेत दिसेल.

 

 

पाहा ट्रेलर