Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. गौरवने आता चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. गौरवला महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याहस्ते 'भीमरत्न पुरस्कार 2022' देण्यात आला आहे. गौरवने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.  


'भीमरत्न पुरस्कार 2022' हा पुरस्कार मिळाल्यानंतर गौरवने फोटो शेअर करत लिहिले आहे,"भिमरत्न पुरस्कार सोहळा 2022. खरचं मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाही. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देण्याऱ्यांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे. आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात. खूप आभारी आहे".


गौरवने पुढे लिहिले आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. सोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि मधुर शिंदेदेखील उपस्थित होते. गौरव मोरेच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेंच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील गौरवच्या या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. 






गौरवने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून अभिनय करायला सुरुवात केली आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव घराघरांत पोहोचला. गौरवने संजू, कामयाब, झोया फॅक्टर या सिनेमातदेखील काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Heropanti 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित