Akshay Kumar : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार सध्या अनेक शहरांत दौरे करत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाची टीम पुण्यात आली होती. प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने चक्क पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला होता. अक्षय कुमारचा मिसळ चाखतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



अक्षयचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. येत्या 11 ऑगस्टला अर्थात ‘रक्षा बंधन’च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार चार बहिणींच्या एकुलत्या एक भावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. याच प्रमोशन दरम्यान छोटासा ब्रेक घेत, अक्षयने मिसळ पावची चव चाखली आहे. याचा फोटो स्वतः खिलाडी कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


पाहा पोस्ट :



अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवरून मिसळ खातानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय कुमारश ‘रक्षा बंधन’ चित्रपटाची संपूर्ण टीम देखील आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिलं की, ‘प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळपाव! मन आणि पोट दोन्ही भरलं आहे. श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे खूप खूप धन्यवाद. खूप छान!’


चार बहिणींच्या एकुलत्या एक भावाची कथा!


'रक्षा बंधन' हा  प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. हा चित्रपट चार बहिणी आणि एक भाऊ यांच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. अक्षयच्या या चित्रपटात भरपूर फॅमिली ड्रामा असणार आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


पुन्हा एकदा झळकणार भूमी आणि अक्षयची जोडी


'रक्षा बंधन' या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. याआधी दोघे 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यामुळे प्रेक्षक आता दोघांना 'रक्षा बंधन' चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  


हेही वाचा :