Akshay Kumar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असतो. अक्षयचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघतात. पण अक्षय सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकरी अक्षयला ट्रोल करत आहेत. 


अक्षयनं शेअर केला व्हिडीओ


अक्षयनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी 100 टक्के शुद्ध देसी मनोरंजन आम्ही घेऊन येत आहेत. सीट बेल्ट बांधा, आम्ही मार्चमध्ये येत आहोत.' या व्हिडीओमध्ये तो एका पृथ्वीच्या इमेजवर चालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षयसोबतच नोरा फतेही (Nora Fatehi), मौनी रॉय (Mouni Roy) आणि दिशा पटानी (Disha Patani) हे कलाकार देखील दिसत आहेत. अक्षयचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केलं आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. 'आमच्या भारताचा थोडा तरी आदर कर', अशी कमेंट अक्षयच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, कॅनेडियन कुमार, कोणत्याही देशाच्या नकाशावर पाय का ठेवावा?'. एका नेटकऱ्यानं अक्षयच्या व्हिडीओला कमेंट केली, 'हा देशद्रोह आहे.'


पाहा व्हिडीओ: 










अक्षयचे आगामी चित्रपट 


अक्षयच्या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा सेल्फी हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.  तसेच बडे मिया छोटे मिया,  मै खिलाडी तू अनाडी, वेडात मराठे वीर दौडले सात हे अक्षयचे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामधील वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.  काही महिन्यांपूर्वी अक्षयचा राम सेतू हा चित्रपट रिलीज झाला होता. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Selfiee Trailer: फॅन, सुपरस्टार आणि 'सेल्फी'ची गोष्ट; अक्षय आणि इमरानच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?