Pathaan Box Office Day 13: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 13 दिवस झाले आहे. या चित्रपटानं एका आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना दिसत आहे. या चित्रपटानं दुसऱ्या वीकेंडला चांगली कमाई केली. पण सोमवारी (6 फेब्रुवारी) या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. 


रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'सोमवारी पठाण चित्रपटानं भारतात 8 कोटींची कमाई केली आहे.' आता पठाण हा चित्रपट भारतात 450 कोटींचा टप्पा लवकरच पार करेल, असं म्हटलं जात आहे. 






पठाणच्या कमाईत घट


पठाणनं दुसऱ्या वीकेंडला म्हणजेच शनिवारी (4 फेब्रुवारी) 22.50 कोटींची कमाई केली. तर रविवारी (5 फेब्रुवारी) या चित्रपटानं 29 कोटींची कमाई केली आहे. आता सोमवारी (6 फेब्रुवारी) या चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण झाली असून या चित्रपटानं 13 व्या दिवशी  8 कोटींची कमाई केली आहे. 


1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार पठाण? 


पठाण हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 1000 कोटी होईल, असा अंदाज लावला जात आहे. सध्या पठाणनं जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास 850 कोटी एवढं झालं आहे. 


पठाणची भारतात रेकॉर्ड ब्रेक कमाई


शाहरुखच्या पठाण या चित्रपटानं भारतात जवळपास 415 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटानं काही सुपरहिट चित्रपटांच्या कलेक्शनचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. दंगल (Dangal), संजू (Sanju), पीके (Pk), टायगर जिंदा है (Tiger Zinda Hai) या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले आहे. 


पठाणची स्टार कास्ट 


पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Shah Rukh Khan: चिमुकली म्हणते, 'पठाण नाही आवडला'; शाहरुखचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला, 'देशाच्या तरुण पिढीचा...'