Akshay Kumar Pan Masala Ad:  पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून  खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar ) चर्चेत आहे. अक्षय, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्या  पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओवर आता अक्षयनं मौन सोडलं आहे.


ट्विटरवर अक्षयच्या पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल एक बातमी शेअर करण्यात आली होती. या बातमीमध्ये लिहिलं होतं की, 'अक्षय कुमार  पान मसाला ब्रँडचा अॅम्बेसेडर म्हणून पुन्हा काम करत आहे.' या बातमीला ट्विटवर रिप्लाय देत अक्षयनं या जाहिरातीबाबत स्पष्टिकरण दिलं आहे. 


अक्षयचं ट्वीट


अक्षयनं ट्वीटमध्ये लिहिलं, "अॅम्बेसेडर म्हणून परतला? तुम्हाला जर खोट्या बातम्या पसरवण्यापेक्षा खरं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मी ही माहिती देतो की, या जाहिराती 13ऑक्टोबर 2021 मध्ये शूट केल्या गेल्या. मी जेव्हा जाहीरपणे ही घोषणा केली की, मी अशा जाहिरातींना  समर्थन करणं बंद करणार आहे, तेव्हापासून माझा या ब्रँडशी काहीही संबंध नाही. ते पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत कायदेशीररीत्या आधीच शूट केलेल्या जाहिराती चालवू शकतात. त्यामुळे शांत व्हा आणि  खऱ्या बातम्या करा."




मोदी भक्त म्हणणाऱ्या लोकांनाही दिलं उत्तर


एका मुलाखतीत अक्षय कुमारला विचारण्यात आले की, त्याला मोदी भक्त का म्हणतात? यावर अक्षय म्हणाला, "काही लोक माझ्यावर टॉयलेट: एक प्रेम कथा या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छ भारतचा प्रचार केल्याचा आरोप करतात हे खरे आहे. मी पॅडमॅन चित्रपट देखील बनवला होता. पण काही लोकांचे याकडे लक्ष गेले नाही की,मी एअरलिफ्ट हा चित्रपट देखील बनवला, जो काँग्रेसच्या काळातील होती."


पुढे अक्षय म्हणाला, "अगदी मिशन रानीगंज हा चित्रपट देखील काँग्रेसच्या काळातील आहे. पण याकडे कोणी लक्ष वेधत नाही. त्यांच्या कथेसाठी जे सोयीचे असेल तेव्हाच ते या गोष्टी सांगतात.जेव्हा मला  कथा चांगली वाटली तेव्हा मी टॉयलेट: एक प्रेम कथा बनवली. मी मिशन मंगलही बनवला आबे. एकच गोष्ट आहे की, हा एक चांगला विषय आहे आणि त्यावर चित्रपट बनला आहे बाकी काही नाही.' अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Mission Raniganj Review: अक्षयने मांडली रिअल लाईफ हिरो जसवंत सिंह गिल यांची कहाणी; कसा आहे 'मिशन रानीगंज'? वाचा रिव्ह्यू