Akshay Kumar Movie Sky Force Release Date : अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. 2023 मध्ये खिलाडीचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आज गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2023) अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' (Sky Force) सिनेमाची घोषणा केली आहे. 


खिलाडी कुमारने केली 'स्काय फोर्स' सिनेमाची घोषणा


अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीनिमित्त सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची घोषणा करत अभिनेत्याने या सिनेमाचा टीझरदेखील शेअर केला आहे. 


अक्षय कुमारने शेअर केला 'स्काय फोर्स'चा टीझर (Akshay Kumar Shared Sky Force Teaser)


अक्षय कुमारने सोशल मीडियावर 'स्काय फोर्स' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 'स्काय फोर्स' हा सिनेमा भारताच्या पहिल्या हवाई युद्धावर आधारित आहे. या सिनेमात खिलाडी कुमार हवाई दलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे,"आज गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त संपूर्ण देश जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानच्या घोषणा देत आहे. 






अक्षयने पुढे लिहिलं आहे,"स्काय फोर्स' या सिनेमाची घोषणा करण्यासाठी आजच्यासारखा दिवस असूच शकत नाही. हवाई युद्धाची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमावर प्रेम करा. जय हिंद..जय भारत...'स्काय फोर्स' हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल". 


जिओ स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत 'स्काय फोर्स' या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. खिलाडीने शेअर केलेल्या टीझरवर आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, 'स्काय फोर्स' ब्लॉकबस्टर होणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 'स्काय फोर्स' या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर आणि संदीप केवलानी यांनी केलं आहे. 


अक्षयच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Akshay Kuamr Upcoming Movies)


'स्काय फोर्स' या सिनेमासह अक्षयचे 'मिशन रानीगंज','बडे मिया छोटे मिया','वेलकम 3','हेरा फेरी 3','हाऊसफुल 5','सोरारई पोटरू' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 


संबंधित बातम्या


October 2023 Release : ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 14 सिनेमे होणार प्रदर्शित