Prakash Jha : बॉयकॉट ट्रेडचा सध्या बॉलिवूड चित्रपटांवर परिणाम होत आहे. बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपट चांगली कमाई करत नसल्यानं प्रेक्षकांनी बॉलिवूडकडे पाठ फिरवली आहे का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रिलीज झालेले हिंदी चित्रपट हे पन्नास कोटींच्या क्लबमध्ये देखील सामील होऊ शकले नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेला आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा  (Laal Singh Chaddha) या चित्रपटालाही चांगलाच फटका बसला आहे.  आता याबाबत चित्रपट निर्माते  प्रकाश (Prakash Jha) यांनी त्यांचे मत मांडले आहे.  प्रकाश झा म्हणाले की, सध्या चित्रपट निर्माते हे चांगल्या चित्रपटांची निर्मिती करत नाहीत. 


सध्या प्रकाश झा हे त्यांच्या  'मट्टो की सायकल' या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत.  हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. प्रकाश झा यांनी एका मुलाखतीत लाल सिंह चड्ढाबद्दल सांगितले तसेच त्यांनी हा चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण देखील सांगितले.


प्रकाश झा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'ते मूर्खपणा करत आहेत हे त्यांना समजलं पाहिजे. कलाकारांना जास्त पैसे देऊन कोणताही चित्रपट तयार होत नाही. चित्रपटाची कथा ही चांगली आणि  मनोरंजन करणारी हवी.'


प्रकाश झा पुढे म्हणाले, बहुतेक चित्रपट इंग्रजी, कोरियन, तमिळ आणि तेलगू चित्रपटांचे रिमेक आहेत. लोकांसोबत जोडलेली कथा असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करावी. हिंदी इंडस्ट्रीतील लोक फक्त रिमेक बनवत आहे. जर तुमच्याकडे कथा नसेल तर चित्रपट बनवणे बंद करा. परिश्रम करून काहीतरी नवीन करण्याचा विचार केला पाहिजे. लोक आळशी झाले आहेत.


पुढे ते म्हणाले, अनेक लोक  कथेकडे लक्ष देत नाहीत.  8-10 व्हॅन आणि 20-25 कर्मचाऱ्यांसह शूटसाठी आलेले ग्लॅमर फक्त लोक बघतात. बॉयकॉय ट्रेंडबाबत प्रकाश झा म्हणाले,'दंगल आणि लगान जर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले असते तर बहिष्काराच्या ट्रेंडमुळेच झाले हे आम्हाला समजले असते, पण तुम्ही बनवलेला चित्रपट लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. 'व्वा काय चित्रपट होता' असं म्हणणारे लोक मी अजून पाहिले नाही. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Urvashi Rautela : ट्रोलिंगनंतर पुन्हा भारत-पाकिस्तान सामना बघायला गेली उर्वशी रौतेला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंत...'