Ajay Purkar : 'पावनखिंड' (Pavankhind) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत आहे. या सिनेमातील कलाकारांचंदेखील प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. पण सिनेमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सिनेमात बाजीप्रभूंची भूमिका साकरणारे अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar). 


'पावनखिंड' सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने अजय पुरकर यांना नवी ओळख दिली आहे. त्यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कधी नायक तर कधी खलनायक म्हणून अजय पुरकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.






अजय पुरकर यांचे 'कोडमंत्र' नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात त्यांनी अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम केले होते. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या प्रोजेक्टचा अजय पुरकर भाग आहेत. 


संबंधित बातम्या


Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha