हा चित्रपट 27 डिसेंबर 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीमने जाहीर केले होते. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले आहे.
या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह याची व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ओम राऊत यांनी याआधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा बायोपिक लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार, याबाबत सर्वांनाच उस्तुकता आहे. अभिनेता सलमान खान ही भूमिका करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परंतु त्याला चित्रपटाच्या टीमने अद्याप दुजोरा दिलेला नाही.