मुंबई : बॉलिवूडकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या फिल्मफेअर पुरस्कारांचे काल (शनिवारी)मुंबईत वितरण करण्यात आले. यंद्याच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर बधाई हो, राझी आणि अंधाधुन या चित्रपटांनी वर्चस्व गाजवले. बॉलिवूडमधलं सध्याचं सर्वात फेव्हरेट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांनी यंदाच्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आलिया भट्टच्या राझीने पटकावला.


पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अलिया भट (राझी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)- रणवीर सिंग (पद्मावत)आणि आयुषमान खुराणा (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- नीना गुप्ता (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - गजराज राव (बधाई हो)आणि विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - ईशान खट्टर
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)- सारा अली खान
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मेघना गुलजार (राझी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक)- अमन कौशिक (स्त्री)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - राझी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- अंधाधुन
सर्वोत्कृष्ट कथा - मुल्क (अनुभव सिन्हा)
सर्वोत्कृष्ट पटकथा - अंधाधुन (श्रीराम राघवन, अर्जित बिस्वास, पूजा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव)
सर्वोत्कृष्ट संवाद - बधाई हो (अक्षत घिलडील)
सर्वोत्कृष्ट लघुपट - प्लस मायनस
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन)- दी सॉकर सिटी

सर्वोत्कृष्ट गायक - अर्जित सिंग (ए वतन - राझी)
सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल (घुमर-पद्मावत)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम - पद्मावत (संजय लीला भन्साळी)
सर्वोत्कृष्ट गीतकार - ऐ वतन (गुलजार-राझी)
सर्वोत्कृष्ट बॅकराऊंड स्कोर - अंधाधुन (डॅनियल. बी. जॉर्ज)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन - कुणाल शर्मा (तुम्बाड)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी - कृती महेश मिड्या, ज्योती डी तोमर (घुमर - पद्मावत)

सर्वोत्कृष्ट एडिटिंग - पूजा सुरती (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट ऍक्शन - विक्रम दहीया आणि सुनील रॉड्रीक्स (मुक्काबाज)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - पंकज कुमार (तुम्बाड)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन - नितीन झियानी चौधरी, राकेश यादव (तुम्बाड)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स - रेड चिलीज (झीरो)