अजय देवगणने स्वत:च ट्वीटद्वारे ही माहिती देताना आनंद व्यक्त केला. नीरज पांडे हा या सिनेमाचा दिग्दर्शक असेल. तर चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टरटेन्मेंट करणार आहे. या चित्रपटातून नीरज आणि अजय पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. मात्र चित्रपट कधी प्रदर्शित होणार, अजय देवगणशिवाय सिनेमात आणखी कोण कलाकार असतील, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ऐतिहासिक व्यक्तिरेखांबाबत बोलायचं झालं तर अजय देवगणने याआधी भगत सिंह यांची व्यक्तिरेखा साकारली होती. 'द लीजंड ऑफ भगत सिंह'मध्ये दमदार अभिनय केल्यानंतर आता 'चाणक्य'ची व्यक्तिरेखा साकारणासाठी अजय देवगण सज्ज झाला आहे.
भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या चाणक्य यांनी आपल्या नीतीने विदेशी शासक सिकंदरच्या आक्रमणापासून भारताचं संरक्षण केलं होतं. आता या महान व्यक्तीची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.