Raid 2 Release Date:  अजय देवगणकडे (Ajay Devgan) सध्या अनेक सिक्वेल चित्रपट आहेत. अशा स्थितीतच त्याच्या 'रेड' या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. यापूर्वी Raid 2 या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. पण आता खुद्द अजय देवगणने त्याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'रेड 2' (Raid 2 Release Date) ची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Continues below advertisement

अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रेड 2चे पोस्टर शेअर केले आहे. ही पोस्ट शेअर करत अजय देवगणने म्हटलं की, IRS अमेय पटनायक यांचे पुढील मिशन मे 2025 पासून सुरू होईल! Raid 2 1 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगनचा 'रेड' हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून चाहते या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. 'रेड 2' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अजय देवगन सज्ज आहे. 

अजय देवगनच्या 'रेड 2'मध्ये रितेश देशमुख दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

'रेड 2' हा सिनेमा 1 मे 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात खलनायकाची भूमिका कोण साकारणार हेही समोर आलं आहे. 'रेड 2'मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रितेशला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.      

Continues below advertisement

अजय देवगण अमय पटनायकच्या भूमिकेत

पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली राज कुमार गुप्ता यांनी रेड 2 चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा IRS अमेय पटनायकच्या भूमिकेत परतत आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि रितेश देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.                        

ही बातमी वाचा : 

‘Aspirants’ फेम अभिनेत्याने वयाच्या 39व्या वर्षी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Star Pravah : स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिकांची नांदी, 'लग्नानंतर होईलच प्रेम' अन् 'तू ही रे माझा मितवा' मल्टीस्टारर मालिका येणार भेटीला