Ajay Devgn National Film Awards : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या चर्चेत आहे. नुकताच '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) सोहळा दिल्लीत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अजय देवगणला राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना नक्कीच अभिमान वाटत आहे, असं म्हणत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अजय देवगणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


'68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अजय देवगणला तान्हाजी (Tanhaji) सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अजयने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. 






अजयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 1998 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'जख्म', 2002 साली प्रदर्शित झालेल्या 'लीजेंड ऑफ भगत सिंह' आणि 'तान्हाजी' सिनेमाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या तिन्ही सिनेमांसाठी अजयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


व्हिडीओ शेअर करत अजयने लिहिलं आहे,"काय काय जिंकलो हे मोजत नाही. तर कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुम्हा सर्व चाहत्यांचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करतो आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना नक्कीच अभिमान वाटत आहे".


संबंधित बातम्या


National Film Awards 2022 : 'तान्हाजी'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणं अभिमानास्पद; अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया


National Film Awards 2022 : 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न; विजेत्यांची संपूर्ण यादी...