National Film Awards 2022 : '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...



  • सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : सूराराई पोट्ट्रू

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम

  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: सूराराई पोट्ट्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या आणि तान्हाजी चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रू

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम

  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कारः एके अय्यप्पनम कोशियुम

  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावी

  • सर्वोत्कृष्ट  पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम

  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आला वैकुंठपुरमुलू, एस थमन

  • सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :  जस्टिस डिले बट डिलीवर्ड अॅन्ड थ्री सिस्टर्स (Justice Delayed but Delivered & Three Sisters)जस्टिस डिले बट डिलीवर्ड अॅन्ड थ्री सिस्टर्स

  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक

  • सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक

  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी

  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला

  • सर्वोत्कृष्ट संपादन: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम

  • सर्वोत्कृष्ट मेकअप: नाट्यम

  • सर्वोत्कृष्ट पटकथा: सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन

  • सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: अय्यप्पनम कोशियुम

  • चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश




'गोष्ट एका पैठणीची' या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाला सुवर्णकमळ प्रदान


'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'गोदाकाठ आणि अवांछित' या सिनेमासाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर 'जून' सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या


68th National Film Awards 2022 : 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला; 'गोष्ट एका पैठणीची' या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाला सुवर्णकमळ प्रदान


Dada Saheb Phalke Award 2022 : आशा पारेख 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार