Goshta Eka Paithanichi : '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार'  (68th National Film Awards 2022) सोहळा नुकताच पार पडला असून यात 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या मराठी सिनेमाने बाजी मारली आहे. 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


पैठणीची गोष्ट दोन डिसेंबरला ऐकायला मिळणार


'गोष्ट एका पैठणीची' हा बहुचर्चित सिनेमा येत्या दोन डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा शंतनू रोडेने सांभाळली आहे. या सिनेमात सायली संजीव, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, सुव्रत जोशी, आदिती द्रविड आणि मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 






'गोष्ट एका पैठणीची' या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाला आज सुवर्णकमळ मिळाल्याने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. सायली संजीवने एक खास पोस्ट शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. सायलीने लिहिलं आहे,"स्वप्नांसाठी जगणारी एक सुंदर निर्मय गोष्ट... राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं औचित्य साधत प्लॅनेट मराठी सादर करत आहे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'गोष्ट एका पैठणीची'. दोन डिसेंबरपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात". 


'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमात भोर तालुक्यातील कर्नावडी गावातील एक साधी गृहिणी सायलीने साकारली आहे. प्रेमळपणे घर जपणारी आणि वेळप्रसंगी खंबीरदेखील होणारी सायली या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Shantanu Rode : मनोरंजनक्षेत्रात संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास; सुधीर मुनगंटीवारांनी शंतनु रोडेला लिहिलं खास पत्र


68th National Film Awards 2022 : 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला; 'गोष्ट एका पैठणीची' या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाला सुवर्णकमळ प्रदान