Ajay Devgn First Look Singham Again : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या कॉप युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटाबद्दल चाहत्यांना अपडेट देत असतो.आता, 'सिंघम अगेन'मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अजय देवगण हा त्याच्या जुन्या बाजीराव सिंघमच्या लूकमध्ये  दिसत आहे.


कसा आहे अजय देवगणचा फर्स्ट लूक?


रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी अजय देवगणचेही प्रयत्न सुरू आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने अजय देवगणचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. या लूकमध्ये आधीच्या बाजीराव सिंघमचा दरारा दिसून येत आहे. 


रोहित शेट्टीने फोटो शेअर करताना काय म्हटले?


रोहित शेट्टीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अजय देवगण जवळ लष्कराचे काही जवान उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातात शस्त्रे दिसत आहे. तर, सभोवताली बर्फाच्छिद पर्वत दिसत आहे. रोहित शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बाजीराव सिंघम एसएसपी एसओजी स्पेशल ऑपरेशन ग्रुप सोबत. जम्मू-काश्मीर पोलीस...सिंघम अगेन...लवकरच. 






 


मागील काही दिवसांपासून 'सिंघम अगेन' चित्रपटाचे चित्रीकरण जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे लष्कराच्या जवानांसोबत बसलेले होते. 


कधी रिलीज होणार सिंघम अगेन?


सिंघम अगेन हा चित्रपट  सिंघम सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रोहित शेट्टी कॉप युनिर्व्हसमधील हा पाचवा चित्रपट आहे. याआधी सिंघम अगेन हा 15 ऑगस्ट रोजी झळकणार होता. पण, सध्या या चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली असल्याचे वृत्त आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होईल अशी चर्चा आहे. 


अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत... 


या चित्रपटात अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरने आपले चित्रीकरण पूर्ण केले आहे.