अजय देवगनने पत्नी काजोलचा नंबर ट्विटरवर पोस्ट केला
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2018 06:00 PM (IST)
अजय देवगनचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई : अभिनेता अजय देवगनने पत्नी आणि अभिनेत्री काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अजयचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजयने संध्याकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी ट्वीट केलं आहे. 'काजोल देशाबाहेर आहे. पुढील क्रमांकावर तिच्याशी व्हॉट्सअॅपवरुन समन्वय साधा' असं अजयने म्हटलं आहे. अजयने चक्क काजोलचा नंबर शेअर केल्यामुळे चाहते अवाक झाले. काही सोशल मीडिया यूझर्सनी अजयला ट्रोलही केलं. कोणी अजय झोपेत असल्याचं म्हटलं, तर कोणी अजय मद्यधुंद असल्याचा कयास बांधला. इतकंच नाही, तर अजय ज्या 'विमल पान मसाला'ची जाहिरात करतो, त्यावरुनही त्याला डिवचण्यात आलं. काही जणांनी काजोलचा नंबर ट्रू कॉलर आणि व्हॉट्सअॅपसारख्या अॅपवर चेक केल्यावर हा नंबर खरा असल्याचं आढळलं. त्यामुळे अजयचं अकाऊण्ट झालं आहे की त्याने चुकून नंबर शेअर केला हा प्रश्न पडला आहे.