मेलबर्न : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ऑस्ट्रेलियाच्या एका एअरलाईन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. प्रवाशाच्या रंगावरून त्यांच्यासोबत अपमानास्पद वर्तन केलं जाऊ शकत नाही, असंही शिल्पाने म्हटलं आहे. शिल्पा सिडनीहून मेलबर्नला जात होती, या प्रवासादरम्यान तिला हा अनुभव आला. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबाबत शिल्पाने आपला राग व्यक्त केला आहे.
शिल्पानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की," मेलबर्नला जाताना सिडनी विमानतळावर चेक इन काऊंटरवर तुनक मिजाज मेल नावाची महिला कर्मचारी मला भेटली. तुमच्यासारख्या सावळ्या लोकांसोबत असंच बोलायला हवं, अशा आवेशात ती माझ्याशी बोलत होती. माझी बॅग ओव्हर साईज असल्याचं सांगत तिने मला दुसऱ्या काऊंटरवर पाठवलं. मात्र दुसऱ्या काऊंटरवरील कर्मचाऱ्याने माझी बॅग ओव्हरसाईज नसल्याचं सांगून मला जाण्याची परवानगी दिली."
"त्यानंतर ती महिला कर्माचारी पुन्हा आली आणि काऊंटरवरील दुसऱ्या कर्मचाऱ्याला माझी बॅग तपासण्यास सांगितलं. पुन्हा काऊंटरवरील कर्मचाऱ्यांने मला सामान घेऊन जाण्याची परवानगी दिली", अशी माहिती शिल्पाने आपल्या पोस्टमधून दिली.
शिल्पाने ही पोस्ट लिहिण्याचं कारणची सर्वांनी सांगितलं. "मी ही पोस्ट क्वांटास एअरलाईन्ससाठी लिहिली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत कसं वागावं आणि व्यक्तीचा रंग पाहूण त्यांना अपमानास्पद वागणूक न देण्याची समज देतील", अशी आशा शिल्पाने व्यक्त केली.
तसेच फोटोत पाहा, काय माझी बॅग ओव्हर साईज आहे?, असंही शिल्पाने पोस्टमधून विचारलं आहे.
यापूर्वीही शिल्पाला वर्णभेदाचा सामान करावा लागला होता. 2007मध्ये शिल्पा ‘बिग ब्रदर’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी काही स्पर्धकांकडून तिला तिच्या रंगावरून अपमानस्पद वागणूक मिळाली होती. या रिअॅरिटी शोची शिल्पा विजेती ठरली होती.