Hema Malini : बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी (Hema Malini) सध्या चर्चेत आहे. त्यांनी आपल्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता नुकतचं त्यांनी गंगा नदीवर आधारित असलेला एक बॅले डान्स (Belly Dance) म्हणजेच नृत्यनाटिका सादर करत सर्वांना थक्क केलं आहे. 


मुंबईतील एनसीपीएच्या मैदानात नुकताच एक भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजे 75 व्या वर्षात 'आजादी का अमृत महोत्सव' म्हणून आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी यांनी 'गंगा' ही नृत्यनाटिका सादर केली. 


'गंगा' ही नृत्यनाटिका सादर करताना हेमा मालिनी यांनी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. हवेत तरंगत एरियल प्रकारे त्यांना हा बॅले डान्स सादर केला. हेमा मालिनी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी बॅले डान्स करत प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांचे बॅले डान्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 






'गंगा' नृत्यनाटिकेबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या...


हेमा मालिनी म्हणाल्या, "आजच्या तरुण पिढीला नद्यांशी जोडणे आणि नद्यांची काळजी घेण्यास प्रवृत्त करणे , असे उदात्त ध्येय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उदात्त उपक्रमात सहभागी होताना मला अभिमान वाटतो. ‘चलीये, जानिये  नदी को.’ या अभियानातील माझे योगदान म्हणजे 'गंगा ' हे चांगले संशोधन केलेले आणि कौशल्यपूर्ण नृत्य सादरीकरण सादर करणे.हे नृत्यनाट्य आम्हा सर्वांना आमच्या नद्यांची काळजी घेण्यासाठी आणि एकत्रित मानवी प्रयत्नांद्वारे त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे".


हेमा मालिनी यांचं नृत्य पाहून लेक ईशा देओलनेदेखील खास पोस्ट लिहिली आहे. ईनाने हेमा मालिनी यांचा नृत्य सादर करतानाचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,"गंगेवर आधारित असलेला माझ्या आईचा बॅले डान्स आज पाहिला. अत्यंत सुंदर आणि नेत्रदीपक होतं. या नृत्याच्या माध्यमातून पर्यावरणासंदर्भात एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खूप खूप प्रेम...आई." 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Hema Malini : त्यांनी भारतीयांची माफी मागावी राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्यावर हेमा मालिनींची टीका